Download App

Ashwini Jagtap २६ कोटींच्या मालकीण… व्याजांतून लाखोंचे उत्पन्न!

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll) काँग्रेसचे (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ११ कोटी ४ लाख ४७ हजार ९७८ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ९४ हजार ८०७ रुपये इतकी तसेच  २ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आहे. तसेच त्यांचे पती लक्ष्मण जगताप यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ४६ लाख ४३ हजार १६ रुपये इतकी आहे. तर १२ लाख ५३ हजार ८४० रुपये किंमतीचे सोने आहे. दोघांची मिळून एकूण संपत्ती तब्ब्ल २६ कोटी रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

अश्विनी जगताप यांचे पुण्यातील हुजूरपागा शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्या स्वतः शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत आहेत. त्या तीन कंपन्यामध्ये व्यवसायिक भागीदार देखील आहेत. त्यांच्या नावे विशेष करून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील केसे तर पतीच्या नावे खेड तालुक्यातील मरकळ, कोयाळी येथे दोघांच्या नावाने जवळपास १४ एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, औंध आणि पुणे शहरातील कोथरूड येथे १० गुंठ्यांपेक्षा अधिक व्यावसायिक जागा आहे.

अश्विनी जगताप यांनी सोमवारी (दि. ६) रोजी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

अश्विनी जगताप यांनी  वेगवेगळ्या गुंतवणुकीतून आपल्याला वार्षिक उत्पन्न ६६ लाख ३६ हजार ७९१ रुपये इतके मिळत असल्याचे दाखवले आहे. तसेच अश्विनी जगताप यांनी स्वतः तसेच आपल्या पतीच्या नावावर एकही गाडी नसल्याचे जाहीर केले आहे.

Tags

follow us