पुणे : काही वर्षांपूर्वी आलेल्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” या मराठी चित्रपटामध्येही अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आमदारकीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून नाणी (चिल्लर) आणली होती. अगदी तसाच प्रकार सध्या चिंचवडकरांना (Chinchwad Bypoll) मंगळवारी अनुभवायला मिळाला. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे उमेदवार राजू काळे (Rahul Kale) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी डिपॉझिट (Diposit) भरण्यासाठी १० हजारांची नाणी आणली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांच्या मराठी चित्रपटाची आठवण अनेकांना आली.
चिंचवड पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे उमेदवार राजू काळे यांचा अर्ज भरतावोळी नाणी मोजतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानो रवी काळे हे चांगलेच चर्चेत आले.
या प्रकारामुळे चर्चा दिवसभर सुरु होती. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अपक्ष राहुल कलाटे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांनीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मंगळवारी (दि. ७) रोजी रयत विद्यार्थी परिषदेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर आणल्याने आधिकार्यांची चांगलीच तारांबळ झाली. १० हजार रुपयांची नाणी आणल्यानं ती मोजताना अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.