पुणे (Pune) : पिंपरी चिंचवड (Chinchwad Election) पोटनिवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाकडून (election commission) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका कारमधून ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाची मोठी कारवाई केली आहे. चिंचवडमध्ये एका चारचाकी वाहनातून चाळीस लाख रुपयांची रोकड पकडली आहे. एवढी मोठी रक्कम कुणाची व कुठे जात होती याची तपासणी निवडणूक आयोगाच तपास पथक करत आहे.
Chinchwad ByPoll : काय सांगता… राहुल कलाटे सर्वात श्रीमंत उमेदवार… जगताप यांनाही टाकले मागे!
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने विठ्ठल उर्फ नाना काटे’ यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. राहुल कलाटे यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.