Pune News : राज्याच्या राजकारणात महत्व अबाधित राखणारा चिंचवड मतदारसंघ. या मतदारसंघात महायुतीने शंकर जगताप (Maharashtra Elections 2024) यांनी तिकीट दिलं आहे. जगताप यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीवर त्यांनी भर दिला आहे. यासाठी पदयात्रा काढली जात असून या पदयात्रांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत आहे. काळेवाडी येथील पदयात्रेत गर्दीने उच्चांक मोडला. काळेवाडी परिसरात मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहून विजयाची माळ जगताप यांच्याच गळ्यात पडणार, हे जवळपास निश्चित झाल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या प्रचारानिमित्त काळेवाडी येथे पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेते हनुमंत गावडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रमोद ताम्हणकर, विनोद नढे, चंद्रकांत नखाते, संतोष कोकणे, निता पाडाळे, ललिता पाटील, सुरेश नढे पाटील, उषा काळे, विमल काळे, माजी स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, काळूराम नढे, देविदास पाटील, बाबासाहेब जगताप, संगिता कोकणे, धर्मा पवार, भरत ठाकूर, राहुल झाडखंडे, प्रविण अहिरे, प्रशांत डाखवे, प्रतिभा ताम्हणकर, रवी खिलारे, रमेश काळे, दिलीप काळे, कल्पना काकुळदे, सोमनाथ तापकीर, विलास पाडाळे, सचिन बाबाजी काळे.
शक्तिप्रदर्शन नव्हे, महाविजयाची पूर्वतयारी; चिंचवडमध्ये शंकर जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज
मधुकर काळे, राहुल झाडखंडे, किरण पन्हाळे, प्रकाश लोहार, सचिन काळे, भरत ठाकूर, अमोल भोसले, विजय सुतार, नवनाथ नढे, आकाश भारती, हर्षद नढे, रवी दाभोळे, रुपेश तापकीर, प्रमोद येवले, विकास साठे, अश्विनी कांबळे, दिपक पंचबुधे, निलेश तापकीर, विशाल वाळके, प्रकाश लोहार, सागर चौधरी, सचिन काळे, कयुम शेख, बबलू शेख, भैय्यासाहेब कांबळे, भरत दोषी, राजाभाऊ शिंदे, शामराव नढे, वाकचौरे मामा, बजरंग नढे, अतुल नढे, स्वप्निल नढे, महेश शिंदे, अनिल क्षीरसागर, पृथ्वीराज नढे, युवराज नढे, प्रवीण मोहिते, योगेश लोहार यांच्यासह महायुती मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळेवाडी गावठाण येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर ज्योतिबा नगर, १०० खोली, पंचनाथ कॉलनी, उंदऱ्या गणपती चौक, क्रांतीवीर कॉलनी, ओंकार कॉलनी, स्त्री हॉस्पिटल, गणेश कॉलनी, कारवार चौक, अलफोन्सा स्कूल रोड, हॉटेल आठवण चौक, आदर्श चौक, बीआरटी रोड, ज्योतिबा उद्यान, पवनानगर या भागात दौरा झाला. यावेळी जागोजागी महिलांनी जगताप यांचे औक्षण केले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात नागरिकांना अभिवादन करत ‘कमळ’ चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन करण्यात आले.
स्व. लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदार निधीतून काळेवाडीत उद्यान असेल, पिंपरी पूल ते काळेवाडी गावठाण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण असेल, पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन असेल, प्रथमोपचार केंद्र अशी काही विकासकामे करण्यात आली. तर काही विकासकामे प्रलंबित आहेत. या विकासकामांना गती देण्यासाठी मी सर्वात प्रथम प्राधान्य देणार आहे. पुढील दोन वर्षात काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून ‘काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार’, अशी ग्वाही काळेवाडीवासियांना देतो असे शंकर जगताप यावेळी म्हणाले.
शंकर जगतापांना लाखाच्या ‘लीड’ने आमदार बनवा, मोरेश्वर भोंडवेंची जगतापांना साथ