Chinwad Bypoll : शिवाजीमहाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादीला धडा शिकवा!

पुणे : एखाद्या कुटुंबावर वाईट प्रसंग ओढवला तर मदतीला जाण्याची आपली परंपरा आहे. हा वारसा, विचार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी येथे येऊन आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाहीत, हेच दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छेद देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादी […]

Ashwini Jagtap Laxman Jagtap

Ashwini Jagtap Laxman Jagtap

पुणे : एखाद्या कुटुंबावर वाईट प्रसंग ओढवला तर मदतीला जाण्याची आपली परंपरा आहे. हा वारसा, विचार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी येथे येऊन आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाहीत, हेच दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छेद देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवा आणि अश्विनी जगताप यांना किमान एक लाखाच्या मताने निवडून द्या, असे आवाहन शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारसभेत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

श्रीरंग बारणे म्हणाले, एखाद्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्यावेळी आपण त्यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. म्हणूनच आपल्याला अश्विनी जगताप यांना किमान लाखाच्या फरकाने निवडून द्यायचे आहे.

Exit mobile version