Download App

पालिकेच्या मदतीने कल्याणीनगर भागात स्वच्छता मोहीम; आमदार बापूसाहेब पठारेंचा पुढाकार

Bapusheb Pathare यांच्या माध्यमातून व महानगरपालिकेच्या सहकार्याने कल्याणीनगर भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Cleanliness campaign in Kalyaninagar area with the help of municipality; Initiative of MLA BapuSaheb Pathare पुणे: वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे (Bapusheb Pathare) यांच्या माध्यमातून व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कल्याणीनगर येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही मोहीम पार पडली. मोहिमेंतर्गत कल्याणीनगर भागातील रस्ते, फुटपाथ, गटार तसेच अस्थाव्यस्थ पडलेले कचऱ्याचे ढीग स्वच्छ करण्यात आले.

आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहुयात. स्वच्छता मोहिमेत प्रशासनासोबतच लोकसहभाग लाभणेही गरजेचे आहे. सोबतच सामाजिक संस्था, संघटना, शाळा यांनीही पुढे यावे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही स्वच्छतेच्या महत्त्व रुजवावे लागणार आहे. संत गाडगेबाबांच्या कार्याचा वसा-वारसा जपून, पुढे नेऊन स्वयंस्फूर्तीने स्वच्छता राखूयात व ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवूया,” असे मत पठारे यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वच्छता मोहिमेत सहभागी सफाई कर्मचाऱ्यांचे यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आभार मानले. मागील आठवड्यातही विमाननगर भागातही अशा पद्धतीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती; ज्यात तिनशे सफाई कर्मचारी सहभागी होते. मतदारसंघातील स्वच्छतेबाबत पठारे हे विविध माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

follow us