‘माझा राहुल गांधी, सुप्रिया ताई अन् सकाळच्या भोंग्याला सवाल…’ डिलिमिटेशनवरून फडणवीस भडकले

CM Devendra Fadanvis यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना डिलिमिटेश विधेयकावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

CM Devendra Fadanvis

CM Devendra Fadanvis

CM Devendra Fadanvis on Rahul gandhi Supriya Sule and Sanjay Raut for delimitation bill : पुण्यात सुरू असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डिलिमिटेश विधेयकावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि सकाळचा भोंगा म्हणत उबाठा खासदार संजय राऊतांना देखील थेट सवाल करत टीका केली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विरोधक किती दुटप्पी आहेत. हे मला तुम्हाला सांगायचं आहे की, पंतप्रधान मोदींनी महिलांना लोकसभेत आरक्षण देण्यासाठी कायदा केला. आता विरोधक सांगत आहेत की, आम्हाला डीलिमीटेशन मंजूर नाही. महिलांना आरक्षण द्या पण डीलिमीटेशन नको. मात्र जेव्हा 2023 ला हे विधेयक आलं तेव्हा या सगळ्यांनी यावर चर्चा केली. एकमताने मतदान केलं. तसेच त्यात त्यावेळीच महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन होतं.

घटस्फोट झाला तरी जॉइंट होम लोनची जबाबदारी संपत नाही; EMI कोण भरणार?, जाणून घ्या नियम

त्यामुळे माझा राहुल गांधी, सुप्रिया ताई आणि सकाळच्या भोंग्याला सवाल आहे की, ज्या कायद्याला तुम्ही 2023 ला मतदान केलं त्यात डिलिमिटेशन होतं की, नव्हतं? नव्हतं तर मग तुम्ही या विधेयलाकाला मतदान का केलं? कारण तुम्हाला महिलांना आरक्षण नव्हतं द्यायचं तुम्हाला माहिती होतं की, आपण मतदान केलं नाही तरी हे बिल पास होईल. मग आपल्याला महिला आरक्षणाला विरोध केल्याचा ठपका बसेल याचा फायदा आम्हाला होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याला मतदान केलं वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

Exit mobile version