सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील भाषेतील रॅप साँगचं शुटिंग

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात बेकायदा रॅप गाणे (Rap song) चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) तक्रार अर्ज देण्यात आला आहे. (Pune Police) संबंधित तरुणांनी तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांकडून रॅप गाणे चित्रित करणाऱ्या तरुणांची चौकशी सुरू केली आहे. शुभम […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T121625.635

university pune

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात बेकायदा रॅप गाणे (Rap song) चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) तक्रार अर्ज देण्यात आला आहे. (Pune Police) संबंधित तरुणांनी तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांकडून रॅप गाणे चित्रित करणाऱ्या तरुणांची चौकशी सुरू केली आहे.

शुभम आनंद जाधव (वय -24, रा. भगवती आशियाना सोसायटी, जयभवानीनगर, पाषाण,पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. रॅपगीत चित्रीकरण केल्या प्रकरणी विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक अधिकारी सुधीर दळवी (वय- 50) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विद्यापीठाच्या आवारात जाधव याने बेकायदा रॅपगीत चित्रीत केले होताे. रॅपगीतात अश्लील शब्द होते. संबंधित रॅपगीत ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर १८ मार्च रोजी प्रसारित करण्यात आली होती.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

विद्यापीठाच्या आवारात बेकायदा बेकायदा रॅप गाणे चित्रीकरण तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दळवी यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी रॅपगीत गायक शुभम जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आरोपीला आजून देखील अटक करण्यात आली नाही, या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

Exit mobile version