Sadananda More resigned : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला आहे. साहित्य साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून त्याला शासकीय स्वरुप घेण्याचा घाट शासन दरबारी होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
मी मंत्र्यांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण गेल्या काही दिवसांत साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभार प्रशासनाचा कामापेक्षा जास्त हस्तक्षेप होत आहे. तशा वातावरणात माझ्यासारख्या माणसाला काम करणे शक्य नाही. त्यामुळे मी राजीनामा दिला, असे सदानंद मोरे यांनी सांगितले.
पवार कुटुंबियावर पडळकर बोलताच रोहित पवार आले मदतीला; फडणवीसांना घेरले !
ते पुढं म्हणाले की त्यांना जर त्यांच्या पद्धतीने साहित्य मंडळ चालवायचे असेल तर मंडळाच्या कोणत्याही घटकाला मान्य होणार नाही. मंडळातील सर्व सदस्यांनी एकमताने ठराव केला आहे की हा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही.
साहित्य मंडळ हे शासकीय यंत्रणेच एक भाग आहे. पण बाकीचे प्रशासन आणि साहित्य मंडळ यात फरक आहे. हा फरक लक्षात घेऊनच नोकरशाहीने आपलं काम केलं पाहिजे. पण तस न करता मंडळाचे नाव बदलने, मंडळाच्या उद्दिष्टांमध्ये फेरफार केला जात आहे. या गोष्टी करुच नयेत असे नाही पण हे बदल करताना शासकीय यंत्रणा उचित नाही. हे साहित्यकांचे, विचारवंताचे काम आहे. त्यांना विश्वासात न घेता हे केलं जात आहे, असा आरोप सदानंद मोरे यांनी केला.