Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने बडतर्फ केल्यानंतर त्या न्यायलयात गेल्या होत्या. नुकताच त्यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहेत. खूप दिवसानंतर त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केलं आहे. आपल्याविरोधात नरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि त्याला नकारात्मक पुरावे जोडण्यात आल्याचा थेट पलटवार त्यांनी केला आहे.
पुणे कलेक्टर ऑफिसला असताना मलाच पूजा खेडकर यांनी आरोप फेटाळत केला हा मोठा दावा
यावेळी पूजा खेडकर यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. मला माझं पद पुन्हा बहाल होईल याची खात्री आहे आणि मी पुन्हा आयएएस होईन असा विश्वास पूजा खेडकर यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर त्या म्हणाल्या, मसुरीत प्रशिक्षण सुरू असताना ८ वेळा मेमो मिळाल्याच्या चर्चाही झाल्या. मेमो म्हणजे काय? तिथं एखादी लहानशी गोष्ट चुकीची केली तरी मेमो काढला जातो. मग त्यात एखाद्या वेळी उशीर होणं किंवा काही किरकोळ कारणासाठी नोटीस बजावली जाते. मला संत्री खाल्ली म्हणून मेमो मिळाला होता असं त्या म्हणाल्या आहेत.
दृष्टीदोष पण पूर्ण अंध नाही
दिव्यांग प्रमाणपत्राबाबत पूजा खेडकरने म्हटलं की, मला दृष्टीदोष आहे, पण मी पूर्ण अंध नाही. तुमच्यापेक्षा मला कमी दिसतं. मला मायनस १२ इतका नंबर आहे. भविष्यात माझी दृष्टी पूर्ण जाण्याचीही शक्यता आहे. माझ्या दृष्टीदोषाबाबत किंवा इतर गोष्टी कधीच सांगितल्या नाहीत. कारण कमतरतेमुळे क्षमतेवर शंका घेतली जाऊ शकते. युपीएससीसाठी सगळेच मेहनत करतात आणि त्याग करतात. त्यांना त्याचं फळ नक्कीच मिळत असंही त्या म्हणाल्या आहेत.
मी पुन्हा आयएएस होईन
मीसुद्धा हे ऐकलं, मी भारतातच होते. मी आधीही माध्यमासमोर आले नव्हते. मी नेहमीच प्रयत्न केला की न्यायालयातूनच यावर सर्वांना उत्तर मिळेल. उशिरा का होईना पण कोर्टात न्याय नक्की मिळेल असा विश्वास पूजा खेडकर यांनी व्यक्त केला. मी काही चुकीचं केलं नाही आणि मला खात्री आहे की मी पुन्हा आयएएस होईन, माझं पद मला पुन्हा मिळेल असंही पूजा खेडकर यांनी म्हटलं आहेत. तसंच, मी खूप प्रयत्न केले होते आणि मला यश मिळालं होतं. माझ्याविरोधात युपीएससीने गुन्हा दाखल केला. युपीएससीने सगळं पूर्ण चेक केलं नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.