पुणे कलेक्टर ऑफिसला असताना मलाच…पूजा खेडकर यांनी आरोप फेटाळत केला ‘हा’ मोठा दावा

Pooja Khedkar : गेली अनेक दिवसांपासून माजी प्रशिक्षणार्थी वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आलेल्या आहेत. पूजा खेडकर यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप होत असून त्यांचं प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. (Khedkar) दरम्यान, त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना काही मोठे खुलासे केले आहेत.
या सर्व काळात पूजा खेडकर यांच्यावर सातत्याने आरोप सुरू आहेत. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्याचबरबोर इतकच नाही तर तर आपल्याला पहिल्या दिवसापासून कशाप्रकारे त्रास होतोय हेही त्यांनी सांगितलं. पूजा खेडकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांदरम्यान त्यांच्या आईचा एक बंदूकीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओबद्दल बोलताना पूजा म्हणाल्या की, तो व्हिडीओ अर्धवट होता पूर्ण व्हिडीओ दाखवण्यात आला नाही.
तिनं कोणाचा खून केलाय का? असं विचारत सुप्रीम कोर्टानं दिला पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन
पूजा खेडकर यांची नियुक्ती पुणे कलेक्टर ऑफिसला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर काही आरोप झाली. त्यावर बोलताना ज्या गोष्टी माझ्याबद्दल दाखवण्यात आल्या, त्या चुकीच्या होत्या. उलट कलेक्टर ऑफिसमध्ये मला पहिल्या दिवसापासून त्रास देण्यात आला. सुरूवातीला सांगितलं गेलं की, मी एक कॅबिन मागितले. पण हे कसं शक्य आहे. मी फक्त विचारलं होते की, मला कुठे बसायचं आहगे असंही त्या म्हणाल्या आहेत.
माझ्या गाडीला जो लाल दिवा लावला होता तो काय मी कोणत्या दुकानात जाऊन खरेदी केला होता का? मला तो लाल दिवा पुणे कलेक्टर ऑफिसमधूनच मिळाला होता. तसंच, पूजा म्हणाल्या की, मी कोणतंही माझं नाव बदललं नाहीये. मी फक्त माझ्या नावासोबत आईचं नाव लावलं. माझं नाव पूजा दिलीपराव खेडकर आहे. मी फक्त पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर केलं. यामध्ये चुकीचे काय आहे? असंही त्या म्हणाल्या आहेत.