Video : ‘त्या’ महिलांमध्ये धैर्य अन् साहस नव्हत….भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच वादग्रस्त वक्तव्य

Video : ‘त्या’ महिलांमध्ये धैर्य अन् साहस नव्हत….भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच वादग्रस्त वक्तव्य

Controversial statement of BJP MP Ramchandra Jangda : हरियाणाचे भाजप (BJP)  खासदार रामचंद्र जांगडा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पहलगाममध्ये महिलांनी दहशतवाद्यांचा सामना करायला हवा होता. पण, त्यांच्यात वीरांगनासारखा भाव नव्हता अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

यावेळी जर महिलांनी प्रतिकार केला असता, तर कमी लोक मारले गेले असते. मात्र, अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे शौर्य त्यांच्यामध्ये नव्हतं. अस शौर्य आपण दाखवाव असं आवाहन जांगडा यांनी महिलांना केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळं आता वाद निर्माण झाला आहे.

Video : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, पाहा व्हिडिओ

अगदी लढायला हवे होतं. जर महिला हात जोडण्याऐवजी लढल्या असत्या, तर दहशतवादी मारले गेले असते. पर्यटकांचे मृत्यू कमी झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अग्निवीर योजना’ याचसाठी सुरू केली आहे, असंही ते म्हणाले. जर तेथे पोहोचलेला प्रत्येक पर्यटक अग्निवीर असता, तर त्यांनी दहशतवाद्यांना घेरलं असतं. एकही दहशतवादी परत गेला नसता, असंही जांगडा म्हणाले आहेत.

काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी रामचंद्र जांगडा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हुड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट केली. त्यात ते म्हणतात, “पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्यांचं कुंकू पुसलं, आता त्यांची मर्यादा उद्ध्वस्त करण्याचं काम हरियाणाचे BJP खासदार रामचंद्र जांगडा करत आहेत. हे अत्यंत घृणास्पद विधान आहे.

भाजपकडून शहीद जवानांच्या कुटुंबाचा सतत अपमान होत आहे. यावर लगाम लावला पाहिजे.” रामचंद्र जांगडा यांच्या विधानावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या विधानामुळे महिलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका होत आहे. तर, काहींनी त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या