Download App

सावित्रीबाई फुले विद्यापीठात चित्रीत केलेल्या ‘सल्तनत’ रॅप सॉंगवरुन वादंग

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) चित्रीत करण्यात आलेल्या एका रॅप सॉंगमध्ये आक्षेपार्ह शब्द आणि शिव्या असल्याने हे सॉंग विद्यापीठ परिसरात शूट करण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली, असा आक्षेप नोंदवत विद्यापीठ प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील (Akash Zambare Patil) यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

सल्तनत नावाचे गाणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पार्श्वभूमीवर आणि अंतर्गत भागात चित्रीत करण्यात आले असून या गाण्याच्या चित्रणामध्ये आक्षेपार्ह शब्द आणि शिव्यांचा उपयोग करण्यात आला असून सोबतच मद्य, पिस्तुल, तलवार अशा साहित्याचा वापर देखील करण्यात आल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे झांबरे पाटील म्हणणे आहे. त्यांनी याबाबत आक्षेप नोंदवत कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली आहे.

झांबरे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सांस्कृतिक पुणे शहरात कलागुणांना वाव दिला पाहिजे, हे मान्य करू शकतो. मात्र, कलागुणांच्या नावाखाली शिव्यांचा भडीमार, अश्लीलतेचा उच्चांक गाठला जाणार असेल, आणि त्यासाठी पवित्र, असे विद्येचे केंद्र असणाऱ्या, पूर्वकडचे ऑक्सफर्ड बिरूद मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचे दालन उपबल्ध करून देणे, अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. त्यामुळं या गाण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगी दिलीच कशी? याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कॉंग्रेस आमदाराच्या मुलीने सावरकरवादात काडी टाकली; म्हणाल्या, रेप इज पॉलिटीकल वेपन असे सावरकरांचे विचार

दरम्यान, कुठल्याही गाण्याच्या चित्रीकरणासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगी दिली नाही. मात्र, संबंधित चित्रीकरणाबाबत चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या आधी शिंदे गटाविरोधात रॅप सॉंग बनवल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद निर्माण झाला होता. शिंदे गटाच्या बंडखोरीवर राम मुंगासे या तरुणाने रॅप सॉंग बनवला होता. हा रॅप साँग व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. आता पुन्हा एकदा रॅप सॉंग वरूनच पुण्यात वाद निर्माण झाला आहे. आता याचे पडसाद कायम म्हणतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us