Download App

पूजा खेडकरच्या आईचा नवा प्रताप; चालकाचं अपहरण करुन डांबून ठेवलं…

मिक्सर ट्रकचालकाचं अपहरण केल्याच्या आरोपावरुन वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालायं.

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) आईचा नवा प्रताप समोर आलायं. मिक्सर ट्रकचालकाचं अपहरण करुन डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यामुळे आता पुन्हा एकदा वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आलीयं.

मुलूंड ते एरोली रोडवरुन सिग्नलवर जात असताना मिक्सर ट्रकचालक प्रल्हाद कुमार २२ हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी एका कारला धक्का लागल्याने कारमधील दोघांनी त्याला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसून नेत अपहरण केलं.

पंतप्रधान मोदींचा AI Video काँग्रेसला भोवला ! दिल्लीत भाजपकडून एफआयआर

या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना अपहरणासाठी वापरलेली कारर वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतृशृंगी हद्दीतल्या घरी मिळून आली. या ठिकाणाहून अपहरण केलेला चालक प्रल्हाद कुमारची पोलिस उपनिरीक्षक खरात यांच्यासह त्यांच्या टीमने सुटका केलीयं.

सुख, संपत्ती अन् संतती कोणत्या राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

अपहरण प्रकरणी पोलिस तपास करीत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना सहकार्य केलं नसून याऊलट अरेरावीची भाषा करुन पोलिसांशीस हुज्जत घातलीयं. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून अपहरण केल्याची तक्रार ट्रक मालक विलास धोंडीराम ढंगरे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात दिली. यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी हे IAS पूजा खेडकरच्या बंगल्यात पोलिसांना आढळून आले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत खेडकर यांच्या बंगल्यावर पोहचले. मात्र तेंव्हा IAS पूजा खेडकरच्या आईकने पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.

follow us