Download App

पत्नीच्या घरी अन् ऑफिसला जायचे नाही : न्यायालयाचा पतीला दम; पोलिसांनाही दिल्या सूचना

पती-पत्नीच्या वादात पुणे सत्र न्यायालयाकडून पत्नीला दिलासा देणारा आदेश देण्यात आला आहे. पुण्यात राहणाऱ्या पत्नीला पती तिच्या माहेरी, ऑफिसवर जात त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता, यासंदर्भात पतीच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आरोपांमुळं ब्रिजभूषण सिंह भावूक, म्हणाले…

त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी पत्नीच्या घरी आणि ऑफिसला जाऊन त्रास न देण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने हा एकतर्फी आदेश दिला असून यासंदर्भात पोलिसांनाही सूचित करण्यात आले आहे.

Narendra Modi in Australia : ‘ मी पुन्हा आलो’ म्हणतं PM मोदींनी पूर्ण केलं ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना दिलेलं वचन

या जोडप्याचा विवाह 2003 मध्ये झाला होता. पती एक छोटा व्यवसायिक असून पत्नी नोकरी करतात. या जोडप्याला एक 18 वर्षांची मुलगी आहे. या जोडप्याचा सुखी संसार सुरु होता. पण काही वर्षांपासून पती पत्नीला सातत्याने मारहाण करीत असत.

‘शुभमन गिलच्या बहिणीला अपशब्द वापरल्यास…’; महिला आयोगाचा ट्रोलर्सना थेट इशारा

पतीच्या त्रासाला कंटाळून अखेर पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतरही पतीने पत्नीच्या माहेरी जात आरडाओरडा करुन वाद घालण्याचा प्रयत्न केला. पतीने पत्नीच्या माहेरी जात घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्या होत्या. एवढंच नाहीतर त्याने घराजवळील गाड्याही पेटवून देणार असल्याची धमकी पत्नीला दिली होती.

अतिक अहमदची हत्या अन् लॉरेन्स बिन्शोई गँगचे कनेक्शन उघड; हल्लेखोरांची NIA समोर कबुली

त्यानंतर पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. एकदा तर पतीने पत्नीच्या आईवडिलांच्या घराला कुलूप लावून कोडलं होतं. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. अखेर पत्नीच्या संरक्षणासाठी पत्नीचे वकील अॅड. जान्हवी भोसले यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणी हजर राहण्यासंदर्भात पतीना समन्सही बजावण्यात आले होतं.

दरम्यान, पत्नीला फोन करायचा नाही, मुलीशी संपर्क साधायचा नाही, पत्नीचे ऑफिस व घरी जायचे नाही, पत्नीच्या कुटुंबीयांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास द्यायचा नाही, या बाबींपासून पतीला न्यायालयाने रोखले आहे.

Tags

follow us