शरद मोहोळ खून प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; त्या आरोपीला सोडण्याच्या आदेशाने पुणे पोलिसांना दणका

Sharad Mohol murder case मध्ये कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यातून एका आरोपीला सोडण्याचें आदेश दिल्याने पुणे पोलिसांना दणका मानला जात आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा पोलिसांवरच आरोप

Sharad Mohol

Court’s big decision in Sharad Mohol murder case; Pune police hit by order to release accused : पु्ण्यातील गुन्हेगारी विश्वात टोळीयुद्ध हा पुणे पोलिसांसमोर वारंवार उभा राहत असलेला प्रश्न आहे. यातच अशाच एका टोळी युद्धातून काही वर्षांपूर्वी गुंड शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यातून एका आरोपीला सोडण्याचें आदेश दिल्याने हा पुणे पोलिसांना दणका मानला जात आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

या प्रकरणामध्ये आता मोठं वळण मिळालं आहे. कारण यामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी अटक केलेला एक आरोपी जो या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार मानला जात होता. त्या विठ्ठल शेलारला तातडीने मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. याचे कारण म्हणजे त्याला अटक करताना पुणे पोलिसांनी अटकेची प्रक्रिया काही कायदेशीर त्रुटींसह केली. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी; आरोपी घुले चक्कर येऊन पडला, काय घडलं?

दरम्यान विठ्ठल शेलारने यासाठी मुंबई उच्च न्यायामध्ये हेबियस कॉर्पस रिट याचिका दाखल केली होती. ज्यानुसार आरोपी किंवा संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर 24 तासांच्या आता न्यायालयासमोर हजर केले नसल्यास त्या विरोधात याचिका दाखलस करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार या याचिकेमध्ये पुणे पोलिसांना त्याला अटक केल्यानंतर त्याला नियमानुसार 24 तासांच्या आत न्यायालयात हजर केले नसल्याचा दावा करण्यात आला होता.

सायली संजीवकडून महिला सक्षमीकरण; ‘कैरी’ तून उलगडणार स्त्री हृदयाला स्पर्श करणारा प्रवास

तसेच त्याला अटक केल्यानंतर तिसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले होते. अटक करताना कारण देण्यात आली नव्हती. हे सर्व ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण 5 जानेवारी 2024 ला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदिवा घडलं होतं. ज्यामध्ये  गुंड शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणेसह 18 जणांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली होती.

Exit mobile version