Download App

क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता

  • Written By: Last Updated:

पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे पुण्यातून बेपत्ता झालेले आहेत. महादेव जाधव यांचे (वय ७५, रा. प्लॅट नं. ००२, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

क्रिकेटर केदार जाधव यांचे वडील महादेव जाधव हे आज सकाळी साडेअकरा वाजता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. मात्र, बारा दुपारी वाजताच्या सुमारास ते कर्वेनगर येथील कोकण एक्सप्रेस हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहेत. महादेव जाधव यांना स्मृतीभंश आहे. त्यांना पत्ता व कुटुंबीयांची नावे देखील वेळेवर आठवत नाहीत, असेही कुटुंबीयांनी सांगितले आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात केदार जाधव हे त्यांच्या कुटुंबियासह वास्तव्यास आहेत. त्यांचे वडिल महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंश (डिमेंशिया) हा आजार आहे. त्यामुळे त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. आजारपणामुळे ते नेहमीच घरी असतात. जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावरकरांचा फोटो – Letsupp

सोमवार (दि. २७) रोजी दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ आले होते. तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघून गेले आहेत. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही. त्यामुळे कुटुंबियांनी नंतर अलंकार पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

महादेव जाधव यांच्या अंगात फुल्ल बाहीचा र्शट व ग्रे कलरची पॅन्ट व पायात काळी चप्पल आणि सॉक्स आहेत. उजव्या हाताचे बोटात दोन सोन्याच्या अंगठया आहेत. महादेव जाधव यांचा रंग-गोरा असून केस-पांढरे आहेत. त्यांची उंची ५ फूट ६ इंच आहे. तर डाव्या गालावर शस्त्रक्रिया झाल्याने खड्डाचे व्रण पडलेले आहेत. पुझील तपास अलंकार पोलिस करत आहेत. कोणाला काही माहिती मिळाल्यास अलंकार पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us