Download App

शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा कट उधळला, दोन तरुणांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. शरद मालपोटे, संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

  • Written By: Last Updated:

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील सुतारदरा परिसरात 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान, आता मोहोळ याच्या हत्येचा बदला घेऊ पाहणाऱ्या 2 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने पिस्तुलासह दोन जणांना अटक केली आहे. मोहोळ याच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होतंय असून या हत्येचा बदला घेण्यासाठी या 2 तरुणांचे प्लॅनिंग सुरू होते.

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार! मनपा निवडणुकीच्या तोंडावर तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश… 

गेल्या वर्षी ५ जानेवारीला शरद मोहोळची त्याच्या घराजवळ भरदिवसा चार अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल होतं. आता या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. अशातच त्याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

मोठी बातमी! बच्चू कडूंनी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे नेमकं कारण? 

दोघांकडील दोन पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत. या प्लॅनमध्ये आणखी काही जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या शरद मोहोळ यांच्या हत्येला एक वर्ष होतंय. त्याआधीच या हत्येचा बदला घेण्याची तयारी या दोघांनी केली होती. त्यासाठी या दोघांनी पिस्तूलही आणले होते. त्याचे ‘लक्ष्य’ नेमके कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण कटात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

सध्या शरद मोहोळ हत्येप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंड विठ्ठल शेलारसह 17 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MOCCA) कारवाई करण्यात आली आहे.

गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह साहिल उर्फ ​​मुन्ना संतोष पोळेकर, रामदास उर्फ ​​वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित उर्फ ​​अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसनंद गादंले, रवींद्र पवार, संजय उडान, सतीश शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

follow us