Cutting a cake and posting a status medical student Ends life in Pune : पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात एका 23 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरूणी मुळची राजस्थानची आहे. तिचं नाव ज्योती कृष्णकुमार मीना आहे. तिचं वय 23 वर्षे आहे. दरम्यान ही विद्यार्थीनी अभ्यासात देखील अत्यंत हुशार होती. त्यामुळे तिने असं टोकाचं पाऊल का उचललं. असा प्रश्न तिच्या मैत्रिणींना पडला आहे.
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा पुरस्कार सोहळ्यातील खास अंदाज…
विशेष म्हणजे या विद्यार्थीने दुपारी मैत्रिणींसोबत पार्टी केली, केक कापला. त्यानंतर तिने तिच्या आईसोबतचं स्टेटस देखील ठेवलं. पण त्यानंतर ती गायब झाली. मात्र ती कुठेच दिसेना म्हणून मैत्रिणीने तिचा शोध घेतला. त्यावेळी ती वसतिगृहाच्या एका रिकाम्या खोलीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. त्यावेळी हा प्रकार पाहुन तिची मैत्रिणीला धक्का बसल्याने तिला पॅनिक अॅटॅक आला.
Tariff War : ‘तारिफ’ चा टॅरिफ झाला अन् वसुलीला सुरूवात झाली; टॅरिफ लादण्याची 5 मोठी कारणे
त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना तेथे तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी देखील सापडली आहे. त्यात आता बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या तरूणीबद्दल सांगायचं झाल्यास ही तरूणी मुळची राजस्थानची आहे. तिचं नाव ज्योती कृष्णकुमार मीना आहे. तिचं वय 23 वर्षे आहे. या घटनेनंतर तिचा भाऊ पुण्यात दाखल झाला आहे.
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी गुडन्यूज, ‘या’ योजनेत ऑनलाइन नोंदणी करा; मिळेल मोठा फायदा
दरम्यान ही विद्यार्थीनी अभ्यासात देखील अत्यंत हुशार होती. त्यामुळे तिने असं टोकाचं पाऊल का उचललं. असा प्रश्न तिच्या मैत्रिणींना पडला आहे. दरम्यान या तरूणीने जीवन संपवण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की, मला शिकायचे आहे पण आता माझ्याकडून हे होत नाही. तसेच तिच्यावर आठव्या इयत्तेपासून मानसोपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच तिने टक्कल देखील केल्याचं सांगितलं जात आहे.