गौतमी पाटील कॉन्ट्रॉव्हर्सी क्वीन; पुण्यातील कार्यक्रमानंतर काय होतोय आरोप?

Dancer Gautami Patil Show in Pune : राज्यात सध्या फक्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्याच (Gautami Patil) कार्यक्रमाची चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं धिंगाणा होणार हे एक गणितचं सुरु आहे. एवढंच नाहीतर नृत्यावरुन गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता पुन्हा एकदा गौतमी ही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण […]

Untitled Design   2023 04 08T093200.341

Untitled Design 2023 04 08T093200.341

Dancer Gautami Patil Show in Pune : राज्यात सध्या फक्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्याच (Gautami Patil) कार्यक्रमाची चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं धिंगाणा होणार हे एक गणितचं सुरु आहे. एवढंच नाहीतर नृत्यावरुन गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता पुन्हा एकदा गौतमी ही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील, औंध येथील एम्स रुग्णलयाच्या शेजारी गौतमीचा कार्यक्रम पार पडला. सायलंट झोन असताना या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी कशी दिली? असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. या विषयामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसून येत आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या
राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजू लागले आहे. गौतमीला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ती सतत विविध ठिकाणी कार्यक्रम करतच असते. परंतु नुकतेच पुण्यात गौतमीच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा कार्यक्रम पुण्यातील एम्स रुग्णलायापासून अवघ्या काहीच पावलांवर असलेल्या एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र रुग्णालयाच्या जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत सायलंट झोन असताना पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. या विषयामुळे गौतमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Cannes 2023: असा भंगार ड्रेस कोण घालतं ? कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकची उडवली खिल्ली

गौतमी बनतेय ‘कॉंट्रोव्हर्सी क्वीन’
महाराष्ट्रामध्ये सध्या गौतमी पाटील हे नाव सर्वत्र गाजते आहे. गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळते. ग्रामीण भागात गौतमीच्या कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रित न झाल्याने अनेकवेळा धिंगाणा झाल्याचेदेखील समोर आले आहे. तर तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक छपरावर उभे असताना छप्पर कोसळलेले देखील आपण पाहिले आहे.

Exit mobile version