Download App

Pune Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

पुणे : जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये (Daund Accident) भीषण अपघात झालाय. बस आणि ट्रकच्या अपघातात (Bus truck accident)चौघांचा मृत्यू (Four Death) झालाय. त्यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. सोलापूरहून (Solapur) पुण्याच्या (Pune)दिशेने जाणाऱ्या मार्गावर बस ट्रकचा अपघात झालाय. अपघातामधील जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. आज पहाटे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरहून पुण्याकडं ही बस निघाली होती. चौफुला ओलांडल्यानंतर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच थांबला होता. यादरम्यान सोलापूरवरुन पुण्याला निघालेल्या बस चालकाला ट्रकचा अंदाज न आल्यानं बसनं ट्रकला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एक बाजूचा चक्काचूर झालाय.

बसचा अचानक टायर फुटल्यानं रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मोठ्या ट्रकला ही बस जाऊन धडकली आहे. अपघातात जखमींना नजीकच्या केडगाव मधील हॉस्पिटलमध्ये तसेच पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते.

जखमींना यवत आणि केडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना पुण्यातील रुग्णालयात देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले असून पुढील चौकशी सुरु आहे.

या अपघातमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.या अपघातात पोलीस कर्मचारी नितीन शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. हे पोलीस कर्मचारी पोलीस कमिशनर कार्यालयात कार्यरत होते.

(सविस्तर बातमी लवकरच…)

Tags

follow us