Download App

दिशा सालियन प्रकरणी अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले, न्यायालयात..

आता प्रकरण न्यायालयात गेलं आहे. आता न्यायालय काय तो निर्णय देईल. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी वाटू लागतं की त्याला न्याय मिळालेला नाही त्यावेळी तो न्यायालयात जाऊ शकतो.

Ajit Pawar on Disha Salian Case :दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा (Disha Salian Case) एकदा राजकीय वर्तुळात तापले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल (Mumbai News) केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. या याचिकेत दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत आहेत. दोन दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली होती. आता या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका बैठकीनिमित्त अजित पवार पुण्यात होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत विचारले. त्या प्रकरणातील बातम्या मी वाचत आहे. याबाबत मला जास्त काही माहिती नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरात आणि पुरवणी मागण्यांत मी कालपर्यंत व्यस्त होतो.

या ज्या गोष्टी आता चालल्या आहेत ना माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की बातम्या देताना वस्तुस्थितीला धरून आम्ही बोललं पाहिजे. तसेच बातमी देणाऱ्यानेही वस्तुस्थितीला धरुन बातमी दिली पाहिजे. आता प्रकरण न्यायालयात गेलं आहे. आता न्यायालय काय तो निर्णय देईल. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी वाटू लागतं की त्याला न्याय मिळालेला नाही त्यावेळी तो न्यायालयात जाऊ शकतो, असे अजित पवार म्हणाले.

जयंत पाटील अन् अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा, अर्ध्या तासात कोणती खलबतं?

जयंत पाटील भेटीवर काय म्हणाले अजितदादा?

आज सकाळी जयंत पाटील यांच्याबरोबर झालेल्या भेटीच्या संदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, मीडीयाने काय बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहून बातम्या देत चला. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी एकत्रित आलो होतो. आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होत आहे. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करून ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखभाल करणार आहोत. आजची नेहमीप्रमाणे आमची बैठक होती असे अजित पवार यांनी सांगितले.

follow us