Ajit Pawar News : विकासाचं बोला ना! बाहेरचे म्हणून भावनिक का करता?, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांना केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन मूळ पवार आणि बाहेरचे पवार असा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांना सवाल केला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.
‘…तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही’; विरोधकांना ‘पोपट’ म्हणत फडणवीसांचा हल्लाबोल
अजित पवार म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून दौंडमध्ये शैक्षणिक संस्थेची मागणी केली जात आहे, तुम्ही फक्त ढिगाने मते द्या आम्ही दौंडमध्ये शिक्षणसंस्था उभा करु, असा शब्दच अजित पवार यांनी दिला आहे. तसेच इंदापूर बारामतीसारखंच शैक्षणिक विकास करणार असून माझे मोदी-शाहा बड्या उद्योगपतींशी संबंध आहेत. तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा बाकी काय करायचे ते मी बघतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
हनुमान जयंतीला पोलिसांचाही जल्लोष! समाजवादी जन परिषदेने घेतली हरकत, कारवाईची मागणी
लोकांचा विरोध असताना दंडुकेशाहीने पोलिस बळाचा वापर करुन एकही गोष्ट आम्ही करणार नाही. तुमचा फायदा कसा आहे हेच आम्ही समजून सांगून आपण पुढे जाण्याचं काम करणार आहोत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच असून देश पुढे मोदी नेणार की राहुल गांधी…मोदींच देश पुढे नेणार आहेत. तुम्ही फक्त भावनिक होऊ नका . साहेबांना जेवढं द्याचंच होतं तेवढं आपण दिलं . चार दिवस सासूचे आता चार दिवस सुनेचे आले आहेत. 40 वर्ष झाले तरीही सुनेला बाहेरचे म्हणत आहेत, तुम्ही विकासाचं बोला ना आम्ही कुठे पडतो ते सांगा ना.. भावनिक कशाला करता? असा सवाल अजितदादांनी शरद पवारांना केला आहे.
तसेच एखाद्या घरात कोणी वयस्कर झाल्यावर पोराच्या हाती व्यवसाय दिला जातो मग द्यांना आमच्या हातात. हा भावनिक मुद्दा नाही भविष्याचा प्रश्न आहे. केंद्रात जे सरकार त्याच विचाराच सरकार आपल्याला आणावं लागणार आहे. मागं जे काही झालं गेलं गंगेला मिळालं. वेगवेगळ्या काळात अनेक घटना घडल्या पण इथून पुढे सामंजस भूमिका घेऊन राज्याचा देशाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.