‘…तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही’; विरोधकांना ‘पोपट’ म्हणत फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnvis : ‘चंद्र, सुर्य आहेत, तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांकडून भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार असल्याची टीका केली जात आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना ‘पोपट’ असा उल्लेख करीत जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
‘गंगेतून मथुराकरांना पेयजल’म्हणणाऱ्या हेमा मालिनीला तोंडावर पाडलं; ट्रोलर्सनी सुनावलंच!
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आता हे पोपट तयार झाले आहे ते म्हणतात की 400 पार झाले तर हे संविधान बदलतील, पण मोदींनी सांगितलं की, बाबासाहेबांचं सविधान होतं म्हणूनच चहा विकणारा पंतप्रधान झाला आहे, मोदींनी सांगितलं की गीता ,कुराण पेक्षा संविधान महत्वाचं आहे. जोपर्यंत चंद्र, सुर्य तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, सांगा त्या पोपटांना या शब्दांत फडणवीस यांनी हल्लाबोल चढवला आहे.
तसेच विरोधकांना वाटतं ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, त्यांची लायकीचं तेवढी आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती, विधानसभेची निवडणूक नाहीतर देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. आमची महायुती अन् दुसरीकडे राहुल गांधी आहेत, गांधींकडे 26 पक्षांची खिचडी आहे. आपल्या युतीचं इंजिन मोदी हे पावरफुल इंजिन आहे. इंजिनाला वेगवेगळ्या पक्षांच्या बोग्या लागलेल्या आहेत. . बोग्यामध्ये सर्वांनाच बसण्याची जागा आहे. तिकडे बोग्या तर नाहीच प्रत्येकजण स्वतला इंजिन समजत आहे. त्यांच्या इंजिनमध्ये फक्त चालकच बसतो. यांच्या इंजिनमध्ये फक्त परिवाराला जागा सामान्य माणसांसाठी जागा नाही. यांचं इंजिन हालच नाही डुलत नाही चालतही नाही, अशी सडकून टीका फडणवीस यांनी केली आहे.
विरोधकांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नाही. फक्त शिवराळ भाषा विरोधकांमध्ये आहे. ही गल्लीची नाहीतर दिल्लीची निवडणूक आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यानंतर मनमोहनसिंगच्या सरकारने काय केलं. अमेरिकेसमोर रडले बघा तो पाकिस्तान आमच्यावर बॉम्बस्फोट करतो एखादं लहान बाळ बाजूच्या पोराने मारलं म्हणून जातो अगदी तसंच केलं. पण सर्जिकल स्ट्राईक केल्याने मागील पाच वर्षांत एकही बॉम्बस्फोट झाला नाही, मोदींनी त्यांना असं शिकवलं ही आता त्यांच्याबापात ताकद राहिली नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.