Download App

Deenanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेचा मृत्यू नव्हे तर हत्याच; सुप्रिया सुळे आक्रमक…

पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नसून हत्या आहे, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.

राDeenanath Mangeshkar Hospital : ज्यात सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण चर्चेचा विषय ठरलंय. या प्रकरणी मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी विविध संघटनांसह भिसे कुटुंबियांकडून केली जात आहे. या मृत्यूला दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरु लागलीयं, असं असताना खासदार सुप्रिया सुुळे (Supriya Sule) यांनी गर्भवती महिला(तनिषा भिसे) यांचा मृत्यू झाला नसून हत्या झाली आहे, त्यामुळे या प्रकरणातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं.

‘भाजपचा स्थापना दिवस…झुंबड वाढली पण् मुख्यमंत्र्यांच्या काकू संतापल्या’, नेमकं काय घडलं?

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मृत महिला (तनिषा भिसे) ज्या मुलींना जन्म दिलायं, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक असून मुलींवर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. भिसे कुटुंबिय वेगळ्या दु:खातून जात आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवावी, भिसे यांची जशी हत्या झाली, तसा दिवस राज्यातील कोणत्याही लेकीवर येऊ नये, त्यासाठीच मी इथे आली असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Amol Mitkari On Nitesh Rane : नितेश राणे, गडकरींकडे शिकवणी लावा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर

तसेच डॉ. घैसास यांनीर राजीनामा दिला म्हणजे काय झालं? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे. या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा रोखठोक सवालही सुळे यांंनी केलायं.

follow us