Amol Mitkari On Nitesh Rane : नितेश राणे, गडकरींकडे शिकवणी लावा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर

Amol Mitkari On Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे शिकवणी लावावी, या शब्दांत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलायं. काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत मुस्लिम लोकं नव्हते, असं विधान केलं होतं. त्यावरुन मिटकरी यांनी नितेश राणेंवर तोंडसुख घेतलंय.
संपूर्ण देश विकून झाल्यावर… वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात केंद्रानं लवकरच कठोर कायदा करावा. नितेश राणे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे शिकवणी लावावी, असा टोला मिटकरींनी लगावलायं.
देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, कार्यालय फलकाची शहरात रंगली चर्चा
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा 7 एप्रिलला आपल्या नव्या घरात गृहप्रवेश होतोय. अकोल्यातील आरोग्यनगर भागातील ‘शिव-संभव’ निवासस्थानावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. मिटकरींनी आपल्या घरावर या पुतळ्याची प्रतिष्ठापना केलीय. 9 फुट उंच आणि 6 फुट उंच चौथरा असा हा 15 फुट उंचीचा पुतळा झालाय.