Download App

Pune Bypoll election : ‘महाविकास आघाडीने पहिला स्वतःचे घर…; फडणवीसांचा अजित पवारांना टोला

पुणे : कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll election ) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्षात बंडखोरी झाल्यामुळे त्यापाठीमागे कोणीतरी मोठा नेता असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीला स्वतःचे घर सांभाळता येत नाही आणि ते आमच्यावर घणाघात करत आहेत. त्यांनी पहिला स्वतःचे घर सांभाळावे उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये”, असा खोचक टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या भरगोस मतांनी निवडून येणार असल्याचा, विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, अश्विनी लक्ष्मण जगताप, शंकर जगताप, यासह इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची जयंती होती.

मनसेने दिलेला पाठिंबा हा सशर्त नाही…
मनसेने दिलेला पाठिंबा हा सशर्त नाही. मनसेने मागील काही वर्षांपासून हिंदुत्व स्वीकारले आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, म्हणून आम्ही एका विचाराने चालत आहोत. महाविकास आघाडी हे स्वतःचे घर सांभाळू शकत नाही, आणि ते आमच्यावर घणाघात करत आहेत. त्यांनी पहिला स्वतःचे घर सांभाळले पाहिजे. महाविकास आघाडीने दोन-चार उमेदवार जरी उभे केले तरी चिंचवडचा विजय हा अश्विनी लक्ष्मण जगताप यांचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांचे घर सांभाळावे. उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये, असा खोचक टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

Tags

follow us