Download App

Sandeep Singh Gill : पुणे शहर गाजविणारे संदीपसिंह गिल आता ग्रामीणचे ‘एसपी’; आदेश निघाले

  • Written By: Last Updated:

IPS Officer Sandeep Singh Gill Appointed Pune Rural SP : पुणे शहरातील पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांना अखेर पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रही पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे शहर गाजवणारे संदीपसिंह गिल त्यांच्या कामाच्या स्टाईलने ग्रामीण भागाही गाजवून सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

5 सप्टेंबर रोजी 2024 रोजी निघाले होते बदलीचे आदेश 

गिल यांची बदली 5 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीणचे एसपी (पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक) म्हणून करण्यात आली होती. तर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पंकज देशमुख यांनी मुंबईच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली होती. त्यानंतर देशमुख यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता संदीप गिल यांना आजपासून (दि.) पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षपदाचा कार्यभार संंभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आले आहेत. तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

आदेशात नेमकं काय?

पुणे पोलीस आयुक्त कार्यालाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात संदीपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, पुणे शहर यांची उपरोक्त संदर्भाकित शासन आदेशान्वये पोलीस उप आयुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अशी बदलीने पदस्थापना करण्यात आल्याने, त्यांना या कार्यालयाच्या आस्थापनेवरुन त्यांचे बदलीचे पदस्थापनेचे ठिकाणी हजर होण्याकरीता दि. १७/०५/२०२५ रोजी म. नंतर कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा; दमानियांकडून अनेकांना घाम फोडणारी खळबळजनक मागणी

संदीपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर पदाचा कार्यभार निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांचेकडे सोपवून अनुपालन अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. तर, निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांना सध्याच्या पदाा कार्यभार सांभाळून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर या पदाचा अतिरीक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसभेत दणकावून भाषण ठोकणारे सुळे, शिंदे पाकला टप्प्यात घेणार; मिळाली मोठी जबाबदारी

दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न होताच बदली कशी करता?

पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून 31 जानेवारी 2024 रोजी नियुक्ती देण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. परंतु दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची मुंबईला बदली करण्यात आली. कार्यकाळ न पूर्ण होताच ही बदली करण्यात आली तसेच तत्काळ बदली करताना त्याचे कारणही देण्यात आलेले नाही, असा मुद्दा प्राधिकरणापुढे देशमुख यांच्या वकिलांकडून मांडला होता.

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘बदल्या’ सत्र; पुण्यातील ‘या’ अधिकाऱ्याची बदली, वाचा पूर्ण लिस्ट

पंकज देशमुख यांच्या बदलीमागे कोणतेही कारण दिलेले नाही. अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण न होता मध्येच त्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यासाठी प्रशासकीय कारण देऊन या बदल्या केल्या जातात. परंतु मध्यावधी बदली करताना त्यासाठी एक तरी कारण दिले पाहिले, असे पोलिस कायद्यात सांगण्यात आलेले असल्याचेही म्हटले आहे. पंकज देशमुख यांची मध्येच बदली करण्यासाठी एकही कारण दिलेले नाही. त्यामुळे पुढची सुनावणी होऊपर्यंत देशमुख हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून राहतील, असे प्राधिकरणाने देशमुखांची बदली रद्द करण्याचे दिलेल्या आदेशातत म्हटले होते.

follow us