Devendra Fadanvis Criticize Opposition in Sunetra Pawar Campaign Meeting : लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Election ) होणाऱ्या राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी बारामती मतदारसंघातील लढत आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्यात नणंद-भावजयी अशी लढत होणार आहे.
‘तुला लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो’ उद्धव ठाकरेंचा भर सभेत नारायण राणेंवर घणाघात
यासाठी सध्या स्वतः अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्वच नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी सुनेत्रा पवारांसाठी फुरसुंगी येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभेदरम्यान Deep Fake रोखण्याचं आव्हान; राज्य सरकारकडून कडक कारवाईचे आदेश
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे नेते ठरले आहेत. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मात्र आम्ही हेच विरोधी पक्षाला विचारलं. त्यावेळी ते म्हणाले आमच्याकडे खूप नेते आहेत. मात्र त्यापैकी एक निवडावा लागतो. तेव्हा ते म्हणाले आम्ही पाच-सहा पंतप्रधान बनवू. दरवर्षी नवा पंतप्रधान असणार.
मात्र यापैकी पहिला कोण? दुसरा कोण? हे कसं ठरवणार. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे घंटा खुर्चीचा खेळ करणार आहेत. एक खुर्चीमध्ये ठेवतील, घंटी वाजवतील, घंटी बंद झाल्यानंतर जो पहिला बसेल तो त्यावर्षीचा पंतप्रधान असेल. त्यामुळे या देशाला घंटा खुर्चीचा खेळ विरोधकांकडून करण्यात येतोय. कारण त्यांच्याकडे नेता, नीती आणि नियत नाही. अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली आहे.