Download App

ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होणार; फडणवीसांचा इशारा

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : ड्रग्ज रॅकेट चालवणारा फरार आरोपी ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police( अटक केली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेला ललित हा 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेला 15 दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागत नव्हता. मात्र, आज ललित पाटील याला गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली आहे. दरम्यान, यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी झडत होत्या. सरकारमधील काही मंत्र्यांची नावे या प्रकणात समोर आली होती. दरम्यान, ललित पाटीलला अटक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले ड्रग्ज फ्री महाराष्ट्र या संकल्पनेतून राज्यभरातील सरकारी यंत्रणा काम करत आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी नाशिकमधील या कारखान्याची माहिती मिळाली होती. या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. आता ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल, असं ते म्हणाले.

ड्रग माफिया ललीत पाटील हे तर एक प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण? नाना पटोलेंचा सवाल 

ते म्हणाले, मला काही गोष्टी कळल्या आहेत, पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्यवेळी मी बोलेन. पण, एवढंच सांगतो की, एक मोठी नेक्सस यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, असं फडणवीस म्हणाले.

मी पळालो नाही तर मला पळवण्यात आले, असं ललित पाटील यांने सांगितले. या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावं समोर आली होती. याविषयी फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, ललित पाटील काय बोलतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा आता पोलिस तपासातून जे नेक्सस बाहेर येईल, त्यावर लक्ष द्यायला हवं. पोलीस तपासात नेक्सस बाहेर आलं की, सगळ्यांची तोंड गप्प होतील. पोलीस सर्व तपास करत आहेत. दोषींना अजिबात सोडणार नाही. सगळ्यंवर कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us