Download App

‘राहुल गांधींना मी सिरीयसली घेत नाही’, मोदींवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला. सर्वच पक्षांकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जालोर येथील निवडणूक प्रचार सभेत वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) सडकून टीका केली. आपले खेळाडू चांगल खेळत होते, त्यांनी वर्ल्ड कप जिंकला असता, मात्र, पनौतीने हरवलं, अशी टीका केली. त्यांच्या वक्तव्याचा आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार समाचार घेलता.

Bageshwar Baba : तुकोबारायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याची चूक लक्षात आली? बागेश्वर बाबा म्हणाले… 

आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं या देशात भ्रष्टाचारी आणि दुराचारी नेतेच केवळ भयभीत आहेत. सामान्य माणसांसाठी मोदीजी मसीहा आहेत. सामान्य माणसांसाठी मोदीजी देशाचे रक्षक आहेत. राहूल गांधींना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही, जनताही गांभीर्याने घेत नाही. मग मी का सिरीयसली घेऊ? असं फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केलं. लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघात आणि सगळ्या बुथवर भापजला मजबूत करायचं आहे. जिथं भाजपचे मित्र पक्ष लढतील, तिथं त्यांनी पाठिंबा दिला जाणार आहेत. तर जिथं भाजप लढेल, तिथं ताकतीने भाजपसाठी काम करणं गरजेचं आहे. ही निवडणूक केवळ भाजपसाठीच महत्वाची नाही, तर देशासाठी महत्वाची आहे. २०२४ ते २०२९ हा मोदींचा कार्यकाळ फार महत्वाचा असणार आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी ताकदीने पक्षासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळं ध्येय समोर ठेऊन सर्वांनी काम करावं.

नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे दाऊद कनेक्शन? 

आषाढी एकादशीला कधी जाणार, असा प्रश्न विचारताच फडणवीस म्हणाले, आषाढीला कधीही जाता येत… मुख्यमंत्र्यांसोबत मी या वेळेला ही जाऊ शकतो, असं फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधींनी सभेत पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी. भारतीय संघ चांगला खेळत होता, पण हे पनौती तिथे गेली आणि आपल्या संघाचा पराभव झाला. आपले खेळाडू विश्वचषक जिंकू शकले असते, पण पनौती तिथं गेल्यानं संघ हरला. टीव्हीवाले हे म्हणणार नाहीत, पण लोकांना ते माहीत आहे. मोदींच्या धोरणाचा फायदा देशातील मोजक्याच उद्योगपतींना झाला आहे. गेल्या नऊ वर्षांत मोदींनी देशातील दहा-पंधरा उद्योगपतींचे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असंही राहुल म्हणाले.

 

 

 

follow us