नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे दाऊद कनेक्शन?
Maharashtra Crime: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हत्येसाठी गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीतील सदस्याने आपल्याला सुपारी दिल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. त्याने मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला फोन करून सुपारी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने सुत्र हालवत त्याला अटक केली आहे.
एका अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 29 वर्षीय आरोपीचे नाव कामरान अमीर खान असे आहे. तो सायन पूर्व, मुंबई येथील रहिवासी असून त्याने मंगळवारी हा धमकीचा फोन केला. मात्र हा कॉल खोटा निघाला.
यापूर्वीही फोनवर धमकी दिली होती
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित असाच एक फोन कॉल प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
One Nation One election चा कोणत्या पक्षाला फायदा? माजी राष्ट्रपतींनी स्पष्टच सांगितलं
पोलीस अधिकारी म्हणाले, आरोपींनी मंगळवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून सरकारी जेजे हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका सदस्याने आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची सुपारी दिल्याचा दावाही त्याने केला होता.
रुग्णालयातील गर्दीने वैतागला
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने जेजे रुग्णालयात असताना पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. रुग्णांच्या लांबच लांब रांगा असल्यामुळे त्याला डॉक्टरांना भेटण्यास उशीर होत होता. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि याआधीही त्याला बनावट कॉल प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाची उपराष्ट्रपतींकडे मागणी
ते म्हणाले की, खानविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.