Download App

Lok Sabha Election: शरद पवारांचं दुकान बंद पडू लागलंय, त्यामुळेच…, देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका

Devendra Fadanvis यांची महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पुण्यातील भोसरी येथे तुफानी सभा झाली.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis Public meeting For Shivajirao Adhalrao Patil : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पुण्यातील भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची तुफानी सभा झाली. पुण्यात आज अवकाळी पाऊस झाला. त्यानंतरही आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासाठी सभा झाली आहे. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार निशाणा साधलाय. शरद पवारांचं दुकान बंद पडू लागले आहे. त्यामुळेच ते आपला माल दुसऱ्यांच्या दुकानात विकायला ठेवत आहे. अशी टीका फडणवीस यांनी केलीय.

Hero Heroin साठी प्रेरणा अरोराचा मोठा निर्णय; म्हणाली ‘नो कॉम्प्रोमाइस’…

फडणवीस म्हणाले, बारामतीची निवडणूक झाल्यानंतर पवार यांचे भाषण ऐकले. शरद पवार म्हणाले चार तारखेनंतर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन करावे लागेल. आता मला सांगा, ज्यांच दुकान जोरात चालतं ते आपलं दुकान दुसऱ्याच्या दुकानात देतील का ? ज्यांच दुकान चालत नाही, तेच दुसऱ्याला आपल्या दुकानातील माल सुपूर्द करतात. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांच्या लक्षात आले आहे. आता हवा अजितदादांच्या बाजूने वाहू लागली आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले आता सगळी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. पवारसाहेबांचा पक्ष नाही. तर आमच्या उद्धव ठाकरे यांचाही पक्ष तिकडे जाईल. कारण त्यांचे गाइड शरद पवार आहेत.

दोघांनी खऱ्या राष्ट्रवादी, शिवसेनेबरोबर यावेत-फडणवीस

पण कालच पंतप्रधान यांनी सांगितले की, काँग्रेस डुबते जहाज आहे. तुमच्या कोणत्याच अपेक्षा तिकडे पूर्ण होणार नाहीत. तेही डुबतील आणि तुम्हाला ही डुबतील. तुम्हाला खरंच काही करायचे असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत यावे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे. खऱ्या राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर यावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Madhuri Dixit ला भावाला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहन

तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अमोल कोल्हे यांना लोक गावात ज्या पद्धतीने स्वागत करून तुम्ही पाच वर्ष कुठे होतात, असे विचारात आहेत. लोकांची ही स्टाईल मला आवडली. असं म्हणत फडणवीसांनी शिरूरमध्ये आढळरावांसाठी फटकेबाजी केली.

follow us