Download App

Pune Water: पाणी कुठं तरी मुरतंय; आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

पुणे पाणी योजनेवर आमदार रवी धंगेकरांकडून प्रश्न उपस्थित करताच देवेंद्र फडणवीसांकडून सविस्तर उत्तर देण्यात आलं.

Image Credit: Letsupp

 Assembly session : समान पाणी वाटपाची योजना काही एका दिवसात झालेली नाही. तीला किमान ८ वर्षांचा कालावधी लागला असं म्हणत फडणवीसांनी पुणे पाणी योजनेवर सविस्तर माहती दिली. याबाबत कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते.

इतका पुरवठा 

पुण्यात 72 लाख लोखसंख्या सरकारने गृहित धरली आहे. शरही भागात प्रतिमाणूस १५० लिटर आपण पाणी देतो. राज्यातील सर्व शहरांसाठी हा निकष आहे. दरम्यान, पुण्यात ११.६० टीएमसी पाण्याची तरतूद आहे. परंतु, तरतुदीच्या विरुद्ध जाऊन  १४.६१ टीएमसीला मंजूरी देण्यात आलेली आहे. म्हणजे,  तुदीपेक्षा ३ टक्के जास्त मंजूरी देण्यात आलेली आहे. दरम्यान, त्यामध्ये सर्वत्र मिळून शहराचा वापर आहे २०.७८ टीएमसी. म्हणजे तरतुदीच्या दुप्पट पुणे शहराला पाण्याचा वापर होत आहे अशी सविस्तर माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

४० टक्के गळती

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, तरतुदीनुसार पुण्याला सध्या पाणी पाहिजे १२.८२ टीएमसी इतकं. परंतु, आज पुणे २०. ७८ टीएसी पाण्याचा वापर होत आहे. म्हणजेच, मोठ्या प्रमाणात गळती आहे, विनानोंद पद्धतीने पाणी वाटप आहे. या सगळ्याची दखल घेऊन हे पाणी वाटप व्हायला हव असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, पाण्याच्या एका एका थेंबाचा हिशोब व्हायला हवा असंही ते यावेळी म्हणाले आहेत. त्याचवेळी यामध्ये सुमारे ४० टक्के गळती आहे. ती २० टक्क्यांवर आणण्याचं काम सुरू असून लवकरच यामध्ये सुधारणा होईल असंही यावेळी बोलताना सांगितलं.

follow us

वेब स्टोरीज