Download App

रोहित पवारांवरील कारवाईला राजकारणाशी जोडू नका; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (Directorate of Enforcement) छापेमारी केलीय. बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी भाजपवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे.

अयोध्या कोणाच्या बापाचा नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस म्हणाले; रोहित पवारांच्या संस्थेवर इडीने केलेल्या कारवाईला भाजपच्या सुडाच्या राजकारणाची जोड देणे म्हणजे विनाकारण शहीद होण्याचे प्रयत्न आहे. छापेमारी झाल्याची मला माहिती नाही. रोहित पवार बिजनेस करतात, बिजनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात. जर त्यांनी सगळे नीट केले असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. या प्रकरणाला राजकारणाशी जोडू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !

श्रीराम हे मांसाहारी होते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाडांवर टीका झाल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांचा जोरदार समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेले वक्तव्य केवळ मूर्खपणाचे आहे. प्रसिद्धी मिळावी, यासाठी हे केले आहे. बदनाम हुआँ तो क्या हुआँ तो नाम तो हो गयाँ अशा प्रकारचे प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहे. हा त्यांचा स्वभाव आहे. खरे म्हणजे प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आहेत. आदिवासींचे आहेत. सर्वांचे आराध्य दैवत आहे. उगाच शाखाहारी आणि मांसाहारी असे त्यांना संबोधन लोकांच्या भावना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत.

आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सर्व बहुजन समाजाचे आहेत आहे. हे सर्व लोक शाकाहारी आहे. त्यांचा अपमान नाही का? अशांतता तयार होईल, असे प्रयत्न आव्हाडांचे आहेत, अशी टीका ही फडणवीस यांनी केली आहे.

follow us