Download App

Rohit Pawar यांना केंद्रीय यंत्रणांचे गिफ्ट! बारामती ॲग्रोसह सहा ठिकाणी ईडीचे छापे

Image Credit: letsupp

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण रोहित यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. आज (5 जानेवारीला) बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये ईडीने सहा ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही; अजितदादांसमोर ‘भाई’ गिरी करणाऱ्या भाजप आमदारांची स्पष्टोक्ती

दरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत काही निवडक लोक राहिले आहेत. त्यामुध्ये कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे शरद पवारांचे खंदे समर्थक आहेत. मात्र यांच्यावर अजित पवार गटाकडून वारंवार हल्ले चढवले जातात. त्यामध्ये आता या ईडीच्या छाप्यांमुळे रोहित पवार पुरते अडचणीत आले आहेत.

Bhumi Pednekar : बॉलिवूड मधून गाजलेल्या अभिनेत्रीनं घेतलाय मोठा निर्णय, ‘आता ओटीटी…’

या अगोदर देखील रोहित पवारांच्या याच बारामती अॅग्रोमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी प्रदुषणाच्या कारणावरून त्यांना महाराष्ट्र प्रदुषण विभागाने 72 तासांत प्लॅंट बंद करण्याची नोटीस दिली होती. मात्र त्यांवर त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली होती. मात्र आता पुन्हा ते याच कंपनीमुळे मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये अडकले आले आहेत.

follow us

वेब स्टोरीज