धनंजय मुंडेंची राजकारणातून थेट क्रिकेटमध्ये एन्ट्री! मराठवाड्याच्या संघाची घेतली जबाबदारी

पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा विभागातील सहा संघ खेळणार असून मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे. Kolhapur : कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; आक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम छत्रपती संभाजी […]

Dhananjay Munde

Dhananjay Munde

पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा विभागातील सहा संघ खेळणार असून मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे.

Kolhapur : कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; आक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम

छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे. नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले.

संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत

या लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स आणि धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हे सहा संघ सहभागी होत आहेत.

WTC 2023 Final : फायनलपूर्वी अवघं ‘ओव्हल’ भावूक; भारतासह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात

सर्वच संघांनी आपले आयकॉन प्लेयर्स नियुक्त केले असून, भारतासाठी अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेला, तसेच रणजी खेळाडू व आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज धाराशिव येथील राजवर्धन हंगरकेर हा छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे.

खळबळजनक! मुंबईत शासकीय वसतिगृहात तरुणीची हत्या, संशयित चौकीदाराचाही आढळला मृतदेह

दरम्यान संघात खेळाडूंच्या बोलीकडून झालेल्या सिलेक्शननंतर या संघात एकूण 22 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, त्यातील 11 खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत, हे विशेष आहे.

ZHZB Box Office Collection: विकी अन् साराच्या ‘जरा हटके जरा बचके’चा बॉक्स ऑफिसवर डंका; जाणून घ्या कलेक्शन

धनंजय मुंडे यांनी संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या असून तसेच खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी मुंडे यांनी स्वत: नेटमध्ये खेळाडूंसह सराव केला.

यावेळी टीम मॅनेजमेंटचे राज घनवट, विजय मुंडे, नितीन, देशमुख, अभिषेक सावलिकर, दर्शन गुजराथी, संतोष माने, व्यंकटेश मुंडे, श्रीनिवास खैरे, प्रमोद दुबे, रोहित देशमुख, मीहिर मुळे यांसह आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version