WTC 2023 Final : फायनलपूर्वी अवघं ‘ओव्हल’ भावूक; भारतासह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात

WTC 2023 Final : फायनलपूर्वी अवघं ‘ओव्हल’ भावूक; भारतासह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात

WTC 2023 Final :  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज (7 जून) सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुप्रसिद्ध ओव्हल मैदानावर हा मुकाबला खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा सामना खेळताना भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे. मात्र या दोन्ही संघाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले आहे? याबाबतच कोडं उलगडलं आहे.

ओडिसातील बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातानंतर अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. बहगाना स्टेशनजवळ मालगाडी, कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा एक्सप्रेस या तीन रेल्वेंची धडक झाल्याने गंभीर अपघात झाला. यात तब्बल 288 लोकांना आपले प्राण गमवावले लागले. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. या अपघातात 1000 अधिक लोक जखमी झाले.

या भीषण अपघाताच्या दुःखाची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. जगभरातून अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वे मंत्री आणि सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहुन मृतांच्या नातावाईकांना धीर दिला. जखमींची विचारपूस केली.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

याच अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून खेळायाला मैदानात उतरले. खेळाडूंच्या या कृतीने फायनलपूर्वी अवघं स्टेडियम भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. खेळाडूंनाही त्यांचे अश्रू लपविता आले नाहीत. सर्व खेळाडूंनी 2 मिनिटं मौन पाळत सर्व मृतांना श्रद्धांजली वाहिली.

दोन्ही संघातील 11 खेळाडू :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube