Download App

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे होते की नाही, याचे उत्तर शरद पवारांकडे’

  • Written By: Last Updated:

पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांचे मुख्यमंत्रीपद होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे शरद पवारांनी म्हटले होते. त्यावर अजित पवार गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पुण्यात एक विधान केले आहे. शरद पवार यांना अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नव्हते, हे उत्तर त्यांच्याकडेच आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच येरवडा प्रकरणात अजित पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा दावाही मुंडे यांनी केला आहे.

मुंडे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती. परंतु ती संधी गमावली आहे. आमच्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण आज पूर्ण होणार नाही. परंतु भविष्यात तरी हे स्वप्न पूर्ण होईल. अजित पवार हे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

Praniti Shinde : बड्या कंत्राटदारांना महाराष्ट्र विकण्याचं भाजपचं षडयंत्र; प्रणिती शिंदेचं टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह व पक्षाचा वादाबाबतही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याबाबत मुंडे म्हणाले, सुनावणी पुढे ढकलेली म्हणून आरोप केले जात आहेत. न्यायव्यवस्थेवर तुम्ही आरोप कसे करत आहात. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. काहीच मान्य करत नसाल, तर लोकशाहीला मान्य करत नाही. हा लोकशाही असणारा देश आहे.

समलिंगी विवाहाला सुप्रीम कोर्टाचा नकार; आरएसएसने केली जाहीर भूमिका

संविधानाच्या आधारेवर सरकार चालते. लोकशाहीत बहुसंख्य मतदार एका पक्षाला सत्ता देते. बहुसंख्य मतदार एका बाजूला जाऊन एका पक्षाला निवडून देतात. दुसरीकडे पक्षांतर्गत लोकशाही असते. बहुतांश पदाधिकारी व आमदार हे एका बाजूला गेल्यानंतर ती लोकशाही मान्य करावी लागते, असा टोलाही मुंडे यांनी लगावला आहे.

येरवड्यातील जागा विकसीत करण्यात येणार होती. त्यासाठी पीपीपी मॉडेल राबविण्यात येणार होते. तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशाने हा निर्णय झाला होता. बोरवणकर या जबाबदार अधिकारी होत्या. परंतु निवृत्त झाल्यानंतर त्या अजित पवारांची बदनामी करत आहेत. अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या अधिकाऱ्याला हे शोभत नाही. या प्रकरणात अजित पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा दावाही धनंजय मुंडेंनी केला आहे.

Tags

follow us