Dhankawadi Shankar Maharaj Samadhi Trust issues clarification regarding FDA action : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील धनकवडीतील शंकर महाराज समाधी मठामध्ये एफडीने स्वयंपाक घर आणि प्रसाद वाटपाची पाहणी केली. त्यावेळी या ठिकाणी काही त्रुटी आढळल्याने एफडीएने कारावाई केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र याबातम्या फेटाळत स्ट्रस्टने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
शंकर महाराज समाधी ट्रस्टचं स्पष्टीकरण नेमकं काय?
सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टकडे अन्न व औषध प्रशासनाचा रितसर परवाना आहे. प्रकट दिनाच्या निमित्ताने एफडीए पुणे कार्यलयातील आधिकाऱ्यांनी समाधी मठातील अद्यायावत स्वयंपाक घराची व प्रसाद वाटपाची तपासणी केली असून कोणत्याही तृटी निदर्शनास आलेल्या नाहीत.
‘मान’ मधून उमटणार स्त्रीशक्तीचा सामूहिक हुंकार; 4 जूनला चित्रपट होणार प्रदर्शित
आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी वर्तमान पत्रे व समाज माध्यमां मधून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई बाबत ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या समधी मठाच्या बाहेरील अनाधिकृत शंकर महाराज अन्नछत्र समितीबाबत असून त्याचा समाधी मठाचा कोणताही संबंध नाही. या कारवाई बाबतच्या बातम्यांमुळे श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या बाबतीत कोणीही गैरसमज व दिशाभूल करवून घेंऊ नये तसेच समाधी मठातील प्रसाद वाटप नियमितपणे सुरू आहे याची नोंद घ्यावी…
