Download App

Dilip Walse Patil : आमदारांच्या हालचाली जाणवतात… लवकरच सरकार कोसळणार ?

पुणे : देशात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार आहे. मात्र, दोन्हीही सरकारच्या योजना या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही सरकार केवळ राजकारण करण्याच व्यस्त असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या आतमध्ये काय सुरु आहे याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळलेल. कारण भाजप-शिंदे गट या दोन्ही आमदारांच्या मनातील हालचाली तीव्रपणे दिसत आहेत. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळणार आहे, असेच संकेत मिळत आहेत, असे माजी विधानसभा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

राजकीय वारसदार कोण, या प्रश्नावर अजितदादा म्हणाले…

राज्यात गारपीट, आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. गारपीट, आवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसानभरपाई दिली पाहिजे. परंतु, राज्य सरकार काहीही करत नसल्याचे दिसत आहे. राज्य सरकार केवळ जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घर सुरक्षित नाही. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्रातील सत्ता-संघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मात्र, त्यावर आताच काही भाष्य़ करता येणार नाही. न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधण योग्य होणार नाही. त्यामुळे आपल्याला या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

Tags

follow us