Download App

मोठी बातमी! तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी पहिला ‘बळी’; मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

Dinanath Mangeshkar Hospital चे तनिषा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

Dinanath Mangeshkar Hospital doctor Sushrut Ghaisas resigns in Tanisha Bhise death case : तनिषा भिसे प्रकरणात मृ्त्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच (Dinanath Mangeshkar Hospital) दोषी असल्याचा ठपका सरकारी कमिटीने ठेवल्यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामध्ये मृत तनिषा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प अन् आकर्षक सजावट; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्यावतीने राम नवमी उत्साहात

राज्यभरातून या प्रकरणावर मोठा आवाज उठवण्यात आला होता. विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील या प्रकरणी आक्रमक झाले होते. सामाजिक संस्थांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यामुळे रूग्णालय प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर तनिषा भिसे यांच्यावर अगोदर पासून उपचार करत असलेले आणि ऐन प्रसृतीच्या वेळी त्यांना पैशांसाठी उपचार नाकारणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.

कौटुंबिक मनोरंजनाचा धमाल तडका! प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनेएक समिती गठीत केली आहे. त्या दरम्यान घैसास यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये सरकार आणि न्यायालयाकडून कुटुंब आणि भिसेंना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोरखे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जेव्हा भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे या गर्भवतीला जेव्हा रक्तश्राव होऊ लागला. तेव्हा पूर्वी दिलेलीच औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला. नाहीतर पूर्ण दहा लाख रुपये भरा तेव्हाच उपचार सुरू होतील. अशा स्पष्ट सूचना डॉक्टरांनी सर्व स्टाफ ला दिल्या होत्या. मग कुटुंब 3 लाख घेऊन बिलिंग विभागात गेले. मात्र पुर्ण पैसे नसल्यास रूग्णाला दाखल करणार नाही . असं मिनाक्षी गोसावी यांनी सांगितलं. तुम्हाला परवडत नसल्यास ससूनला जा असा विचित्र सल्ला आम्हाला गर्भवती अत्यंत नाजून अवस्थेत असताना दिला गेला. हा सर्व प्रकार गर्भवतीने पाहिल्याने तिने त्याचा धसका घेतला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. असा आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सरकारला दणका, पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालाय. तिथल्या प्रशासनाने झुगारून त्यांना अॅडमिशन दिलं नाही. त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना उपचार मिळाले. त्याठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली देखील झाल्या. परंतु दुर्दैवाने त्या आईचा त्याठिकाणी मृत्यू झालाय. दीनानाथ रूग्णालय हे गरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारचा अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे, असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तर आरोपांनंतर दीनानाथ रूग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. रामेश्वर नाईक यांनी देखील रूग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधला होता, परंतु कोणतीही हालचाल केली नाही. जर आमदाराच्या पीएसोबत असं करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा सवाल उपस्थित होतोय.

follow us