Download App

पुणे जिल्ह्याचे विभाजन करा; आमदार लांडगेंची फडणवीसांकडे मागणी; जिल्ह्याला नावही सुचवलं

MLA Mahesh Landge : पुणे (Pune) जिल्ह्यातील आकुर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन (Bhoomipujan) करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil)उपस्थित होते. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge)यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच विभाजन केलेल्या जिल्ह्याला शिवनेरी (Shivneri)असे नाव देण्याचीही मागणी यावेळी केली आहे.

मनपा, झेडपी निवडणुका 2024 मध्ये? ‘या’ कारणांमुळे भाजपला धडकी

पुणे महापालिका स्थापन झाल्यापासून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकच स्त्रोत होता, तो म्हणजे पवना धरण. आणि त्याच्यानंतर 52 वर्षांनी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दुसऱ्या धरणाचे पाणी मिळाले ते म्हणजे भामा आसखेड धरण आणि आंध्रा धरणाचे ते तुमच्या काळात 2014 नंतर 2017 मध्ये आम्हाला पाण्याचा कोटा मंजूर झाला.

हे शहर एकाच धरणावर अवलंबून होते ते म्हणजे पवना, आणि या धरणक्षेत्रात पाऊस झाला तरच आपल्या सर्वांना पाणी मिळायचं, पुढे लोकसंख्या वाढत गेली त्याच्यानंतर दोन दिवसाआड, चार दिवसाआड काहीवेळानंतर अशी परिस्थिती झाली की चार-चार दिवसानंतर पाणी यायला लागलं. त्यानंतर आम्ही असा विचार केला की, या शहरामध्ये लोकसंख्यावाढीचा दर पाहिला तर आपण 10 टक्के सरासरीने वाढ होत आहे.

यावर्षी 30 लाख लोकसंख्या असेल तर पुढच्या वर्षी 33 लाख होईल. जर तीन लाख वाढ झाली तर त्यांना लागणाऱ्या सुविधा असतील त्यांच्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी आपण काही व्हीजन ठेवून काम केलं पाहिजे, असंही भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे म्हणाले.

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पुण्याच्या विविध भागात कचरा डेपोचे प्रकल्प सुरु असल्याचे सांगितले. भोसरी मतदारसंघातील मोशीमध्ये 1972 पासून कचरा टाकला जातो. त्या ठिकाणी कचऱ्याचे मोठ-मोठे डोंगर झाले आहेत. त्यामुळे त्या भागातील हवा प्रदुषित झाली आहे. आणि या हवेनं या भागातील नागरिक आजारी पडू लागले आहेत. येत्या दोन वर्षात हे कचऱ्याचे डोंगर सपाट करणार आहोत.

पुणे शहर वाढत असताना पिंपरी चिंचवड हे छोटसं शहर वाटत असायचं. आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल, महिलांबद्दल काही समस्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला पोलिसांकडे काही तक्रार करायची असेल तर आम्हाला पुणे पोलीस कमिश्नर होतं, पण पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला वेगळं आयुक्तालय मिळालं.

पिंपरी चिंचवड शहराची ओळख, पिंपपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय आपल्या माध्यमातून सुरु झालं आहे. तशीच एक विनंती आज आहे. ती जर तुम्हाला योग्य वाटली तर शहरातील नागरिकांनाही आवडेल असेही ते म्हणाले. जसं पिंपरी चिंचवड शहर मोठं झालं तसं आमचा पुणे जिल्हाही मोठा झाला आहे. त्यामुळे आमच्या पुणे जिल्ह्याच्या विभाजनाचं जरा बघा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे जिल्ह्याचं विभाजन करुन त्यात पिंपरी चिंचवड घेऊन त्या जिल्ह्याला शिवनेरी नाव दिलं तर आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल. त्यासाठी आपण प्रयत्न केले तर आम्हालाही बरं वाटेल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही ताण कमी होईल असेही आमदार महेश लांडगे म्हणाले.

Tags

follow us