पिंपरी- चिंचवड : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपास पथक (एस.आय.टी.) मार्फत करण्यात यावी, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रीय वंजारी सेवा संघ आणि वंजारी सेवा संघ, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठविण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांना निवेदन देण्यात आले.
Video : व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी; अदित्य ठाकरेंकडून पुरावे दाखवत निवडणूक आयोगाची ‘पोलखोल’
संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, “डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण वंजारी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आत्महत्येच्या या प्रकरणामागील जबाबदार अधिकारी आणि संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आमची मागणी केली. न्याय मिळवण्यासाठी या प्रकरणाचा तपास स्वतंत्र एस.आय.टी. मार्फत करावा. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात ढिलाई केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.”
तसेच, या घटनेबाबत संबंधित डीएसपी (फलटण) यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा देऊन डॉ. मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. (Dr. Sampada Munde suicide case: SIT inquiry demanded: Statement submitted to Deputy Commissioner of Police)
महाराष्ट्रासाठी आम्ही रक्त सांडलं; मुंबईवर चाल करून याल तर आडवे करू, मोदी शाहांवर उद्धव ठाकरेंचा वार
या प्रसंगी वंजारी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश आर. ढाकणे, माजी उपमहापौर केशव घोळवे, मा. नगरसेविका योगिता नागरगोजे, डॉ. नारायण जायभाये, कैलास सानप, लक्ष्मण वाघ, विनोद मुंडे, सुरेश घुगे, अमोल नागरगोजे, गोरक्ष सानप, बद्रीनारायण घुगे, गजानन सोनुने, भाऊसाहेब कुटे, वैजिनाथ शिरसाट, ज्ञानेश्वर नागरगोजे, रामहरी केदार, मारुती सोनटक्के, हनुमंत घुगे, श्रवण दहातोंडे, नरसिंगे सुनील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जय गणेश सामाजिक संस्था, भगवान बाबा मित्र मंडळ, तसेच सर्व वंजारी समाज बांधवांनी उपस्थित राहून न्यायासाठी एकमुखाने आवाज उठवला.
