प्रणित मोरेच्या शोतील वक्तव्याप्रकरणी डॉ.सेजल पवार प्रकरणावर चौकशी समिती स्थापन; KEM रुग्णालयाचं महत्त्वाचं पाऊल

Dr. Sejal Pawar Inquiry committee set up by KEM Hospital कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये आक्षेपार्ह विधान करणाऱ्या डॉक्टरबाबात KEM रुग्णालयाचं महत्त्वाचं पाऊल

Untitled Design (32)

Untitled Design (32)

Dr. Sejal Pawar remarks made on Pranit More’s show Inquiry committee set up by KEM Hospital : स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) याचा कॉमेडी शो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय राहिलायं. या कॉमेडी शोमध्ये प्रेक्षक संवाद साधताना आपले अनुभव शेअर करीत असतात. सध्या या कॉमेडी शोमधील एका तरुण डॉक्टरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओतील संवादावरुन नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. एका तरुण महिला डॉक्टर मृतदेहाच्या गुप्तांगाबद्दल अश्लिल विधाने करताना दिसून येत आहे. या संवादावरुन कॉमेडियन प्रणित आणि महिलेवर सडकून टीका केली जात आहे. त्यानंतर आता सेजल पवार शिक्षण घेतल असलेल्या केईएम रूग्णालयाने देखील या प्रकरणामध्ये मोठं पाऊल उचलल आहे.

Nikam Vs Kharat : 628 जणांना जन्मठेप अन् 37 आरोपींना फाशी; निकम लावणार ‘कॅप्टन’चा निकाल

सेजल पवार शिक्षण घेतल असलेल्या केईएम रूग्णालयाने या प्रकरणावर आता चौकशी समिती स्थापन केली आहे. यावर बोलताना केईएम रूग्णालयाचे डीन हरीश पाठक म्हणाले की, आमच्यापर्यंत माहिती आली की, आमच्याकडे शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचा मृतदेहाच्या गुप्तांगाबद्दल अश्लिल विधान करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण अत्यंत संवादशील असून आम्ही या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सेजल पवार (Sejal Pawar) असं या तरुण महिलेचं नाव असून या महिलेने वैद्यकीय क्षेत्रातील आपले अनुभव शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सेजल पवारने जे मृतदेह त्यांच्या रुग्णालयामध्ये आणतात. त्या मृतदेहांच्या लिंगाच्या आकारावरुन मित्र-मैत्रीणी थट्टा मस्करी करत असल्याचा सांगितलं आहे. या अश्लिल संवादावरुन सोशल मीडियावर कॉमेडियन प्रणित मोरेला आणि महिला डॉक्टर सेजल पवार यांना नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलंय.

कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज, बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही; विलिनीकरणावरुन CM फडणवीसांची टीका…

या संपूर्ण घडामोडीनंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी एकच सूर उमटताना दिसून येत आहे. मुली मृत व्यक्तीबद्दलची लैंगिक आणि अश्लिल विधाने करतात ही गोष्ट योग्य आहे का? समाज अशा प्रकारे दुजाभाव का करतो? या शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे एका मेडिकलच्या विद्यार्थ्याने त्याचा अनुभव शेअर करताना म्हटले की, मृतदेहावरुन विनोद करणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे हे मी सांगू शकतो. मला आजही अॅनटॉमीच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर डॉ. बी. डी. चौरसीया यांनी लिहिलेली कविता आठवते ज्यामध्ये मला प्रेमाने आणि काळजीपूर्वक हाताळा अशी विनंती पार्थिव करताना दाखवण्यात आलं आहे, अशी पोस्ट शेअर केलीयं.

 

Exit mobile version