Download App

DRDO Honey Trap : कुरूलकरांसोबत आणखी कितीजण?; ATS कडून आणखी एका अधिकाऱ्याचा फोन जप्त

  • Written By: Last Updated:

DRDO Honey Trap Update : पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आल्यानंतर या अधिकाऱ्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर हनी ट्रॅपमध्ये नेमके किती अधिकारी अडकले आहेत? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

कुरूलकरांनी ब्रह्मोस, अग्नी आणि उपग्रहरोधी क्षेपणास्रांची माहिती पाकिस्तानाला पुरवल्याची बाब समोर आली आहे. पाकिस्तानकडून (Pakistan) गेल्या काही वर्षं भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञांसाठी पद्धतशीरपणे हनी ट्रॅपच जाळे तयार केले जात आहे. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आवडी निवडीची माहिती काढून त्याला हेरले जात आहे. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या अगोदर त्यांच्या वर्तवणुकीचा अभ्यास करण्यात आला होता.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

१५ मेपर्यंत कोठडी

कुरूलकरांची एटीएस कोठडी संपल्याने काल त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनी कोणती संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवली याचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली होत. ही मागणी मान्य करत न्यायालयाने कुरुलकरांची कोठडीत 15 मेपर्यंत वाढ केली आहे.
दरम्यान, एटीएसने ज्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे प्रत्यक्षात या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली कुणाला दिली आहे का? याचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून केला जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे-गौरव बापट भेट, भाजपचा पुण्याचा उमेदवार ठरला?

कसे अडकले कुरूलकर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुरूलकर यांना पाकिस्तानी एजंट असणाऱ्या महिलेकडून एक मेसेज आला होता. ज्यात तिने आपण लंडनची रहिवासी असल्याचे सांगितले होते. यावेळी या महिलेने कुरूलकर देशासाठी करत असलेल्या कामचे कौतुक केले होते. कालांतराने या दोघांमध्ये बोलणे वाढले. संबंधित महिलेला क्षेपणास्त्रांची आवड असल्याने आणि याची माहिती आपण तिला दिल्यास ती आपल्यासाठी काहीही करेल असे कुरूलकरांना वाटले. याच उद्देशाने संबंधित अधिकाऱ्याने DRDO ची गुप्त माहिती त्या महिलेलेा पुरवल्याचे सांगितले जात आहे.

एवढेच नव्हे तर, पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या एजंटने कुरुलकर यांना अडकवण्यासाठी अश्लिल चॅट केले. तसेच कुरूलकर कामानिमित्त रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथून ते महिलेले भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु काही कारणामुळे त्यांचा रशियाचा दौरा रद्द झाला. ते लंडनला देखील गेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Tags

follow us