पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

Devendra Fadnavis On Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्ष हा साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादीत असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचले. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी फौजदाराचा हवालदार झालाय असे सांगत फडणवीसांना डिवचले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाची दोनवेळा फसवणूक केली आहे. थेट पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची फसवणूक अजित पवारांनी केली, असे विधान वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसंदर्भात प्रकाश आंबेडकर काय बोलले, यावर मी प्रतिक्रिया कशाला देऊ, त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी. भारतीय जनता पार्टीची कुणीही फसवणूक करु शकत नाही.

प्रत्येकाला आरक्षणाचं आश्वासन देऊन फसवणूक; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फौजदाराचा झाला हवालदार यावर फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 आणि 2019 रोजी स्वप्न पाहिले. पण, ते पूर्ण झाले नाही आणि यापुढेही होऊ शकत नाही. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यव्यापी पक्षच नाही. शरद पवार यांना खूप लोकांचा अनुभव आहे, त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. पण, मला असे वाटते की त्यांचा पक्ष एकसंध ठेवण्यासाठी त्यांना जी कसरत करावी लागते आहे, ती पाहिल्यावर अन्य पक्षांबद्दल त्यांनी बोलावे की बोलू नये, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.

Ahmednagar : शिवसेना-भाजपचे नगरसेवक महापालिकेच्या सभेतच भिडले…

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक विदारक सत्य जनतेपुढे आले आहे. खरे तर हा केवळ एक सिनेमा नसून जनजागृतीचे माध्यम आहे. हा सिनेमा पाहिल्यावर अनेकांचे डोळे उघडतील, असे फडणवीस म्हणाले. या सिनेमाच्या निर्मात्याला भर चौघांत फाशी दिली पाहिजे, या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाबाबत फडणवीस म्हणाले की, आव्हाड असे बोलले असतील तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी असे बोलून हिंदू समाजात रोष निर्माण होतो. हे वक्तव्य तपासून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल.

https://www.youtube.com/watch?v=-iRiV9C-LsY

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube