Pune News : शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा आजच्या जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू ठरत आहे. AI हे तंत्रज्ञान एक मोठी संधी आहे. पण AI वापर करताना त्याच्या मर्यादा, धोके, नैतिक बाजू याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असे मत लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. पुण्यातील अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात EDUCONTECH-25 ही राज्यस्तरीय परिषद अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ आणि क्रीपॉन एड्युटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी अच्युत गोडबोले बोलत होते.
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदीया, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार जैन, क्रीपॉन एड्युटेक प्रा. लि. या कंपनीचे (Pune News) संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बगाडे, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. सुधाकर शिंदे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉ. राजेंद्र सिंग, उद्योजक भगवान गवई, लेखक किरण देसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रो. रवी आहुजा, निराली पब्लिकेशनचे जिग्नेश फुरिया आदी उपस्थित होते.
यावेळी गोडबोले म्हणाले, ”AI आणि इतर तंत्रज्ञान सतत बदलत आहे. त्यामुळे एकाच शिक्षणाने काम चालणार नाही. आपल्याला सातत्याने नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन याबद्दल अपडेटेड राहणे गरजेचे आहे. AI मुळे अनेक कामे सोपी होणार आहेत पण त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी कसा केला जातो हे महत्वाचे आहे.”
या परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नवीन संधी आणि AI मुळे होणाऱ्या बदलांवर चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील नवीन संधी यावरही चर्चा झाली. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन नवकल्पना व तंत्रज्ञानाच्या आधारे विकास साधण्यावर चर्चा झाली. या परिषदेमध्ये अनेक पॅनल होते त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. परिषदेला राज्यभरातील 200 पेक्षा जास्त कोचिंग क्लासचालक, शिक्षक, तंत्रज्ञान कंपन्या, प्रकाशन संस्था यांचा सहभाग होता. शैक्षणिक उद्योजकतेसाठी परिषदेत सविस्तर चर्चा झाली.
परिषदेला 20 पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालक यांची उपस्थिती होती. यावेळी “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन लीडरशिप अवॉर्ड”, “डिजिटल लीडरशिप इन एज्युकेशन अवॉर्ड” यांसारख्या विविध पुरस्कारांनी क्लासचालकांचा सन्मान करण्यात आला. “EDUCONTECH-25” ही केवळ परिषद नसून महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवसायाला गती देणारी महत्त्वाची परिषद ठरली आहे.