Download App

पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई, आठ बांग्लादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या

  • Written By: Last Updated:

Pune ATS : पुण्यात बांग्लादेशी नागरिकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताच्या सीमाभागातून घुसखोरी करून आलेल्या बांग्लादेशी नागरिकांना विविध शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केले आहे. दरम्यान, उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना (Bangladeshi citizens) अटक करण्यास सुरुवात केली. नुकतीच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti Terrorism Squad) गुरुवारी (14 डिसेंबर) पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे अचानक छापा टाकला. यावेळी बांग्लादेशातून भारतात घुसखोरी करून आलेले 8 बांग्लादेशी घुसखोरांना अटक केली. तसंच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

MLA Disqualification : राहुल नार्वेकरांना दिलासा! आमदार अपात्रतेबाबत निर्णयासाठी मुदतवाढ 

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बांग्लादेशी घुसखोरांच्या वास्तव्याचं प्रमाण वाढल आहे. पोलिसांकडून या घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अशातच नारायणगावावत बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी सकाळी एटीएसच्या पथकाने नारायणगावात छापे टाकला. यावेळी पथकाला 8 बांग्लादेशी नागरिक आढळून आले. हे सर्व नागरिक भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, एटीएसने या घुसखोरांना अटक केली आहे.

Bhumi Pednekar : हाय परम सुंदरी, भूमीच्या मादक अदा 

मेहबुल नजरून शेख, राणा जमातअली मंडल, गफूर राजेवली, आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफिजूर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुज्जम मुल्ला, जमातअली व्हायतअली डल (फरार) (सर्व सध्या रा. नारायणगाव, पुणे मुळं- बांग्लादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व बांगलादेशी नागरिक कोणत्याही वैध प्रवासी दस्तऐवजांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरी करून भारतात अवैधरित्या रहात होते. त्यांचे विरुध्द परीय नागरिक कायदा, 1946 च्या कलम 14, पारपत्र अधिनियम कायदा, 1967 चे कलम 3(ए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे, ठाणे परिसरात आयसीस मॉडयुल संदर्भात कारवाई करत पंधरा जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर एटीएसने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात मोहीम सुरू केल्याचे दिसत आहे. याआधी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार पेठेत कारवाई करून तेथे राहणाऱ्या बांगलादेशी महिला व पुरुषांना अटक केली होती.

दरम्यान, नारायणगावातून अटक केलेल्या बांग्लादेशी नागरिकांची आम्ही तपासणी करत आहोत, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags

follow us