पुणे : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदानाला सुरुवात झालीय. सकाळी सकाळी कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी मतदान केंद्रांवर मतरांमध्ये उत्साह असल्याचं दिसून येतंय. मतदारांची केंद्रांवर गर्दी पाहायला मिळतेय.
या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. आज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहावं लागणारंय.
आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान
कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी लढत होतेय. येथे भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होताना दिसतेय. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे.
या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणूक लढवत आहेत. याशिवाय महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
या पोटनिवडणुकांसाठी भापने आपली मोठी ताकत लावल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांची फळी या प्रचारासाठी उभी केल्याचं पाहायला मिळालं. तर महाविकास आघाडीच्याही ज्येष्ठ नेत्यांसह विविध मान्यवरांनी प्रचारात सहभाग घेतल्याचं दिसून आलं.